Pune : पुण्यात अडकले दोन हजार विद्यार्थी!; घरी जाऊ देण्याची करताहेत मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे सुमारे दोन हजार विद्यार्थी पुण्यात अडकले आहेत. ऊसतोड कामगारांना ज्याप्रकारे त्यांच्या मूळ गावी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रकारे आम्हालाही गावी जाऊ देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन जाहीर केल्यानंतर पुणे शहरातील हॉटेल, खानावळ (मेस) बंद आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे अत्यंत हाल होत आहेत. त्यांच्या नाष्टा व जेवण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, विद्यार्थी घरी जाऊ दिले तर बरे होईल. तर, राजस्थानमधील कोटा शहरात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी उत्तर प्रदेश सरकारने तीनशे बसची व्यवस्था केली.

असाच निर्णय राज्य सरकारने घेण्याची विनंती एमपीएससी स्टुडंट राइट्सतर्फे महेश बडे व किरण निंभोरे यांनी केली आहे. दरम्यान, पुणे शहरात दररोजच कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने सर्वसामान्य पुणेकरांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

यूपीएससी करत असलेल्या विद्यार्थ्यांना, कोरोना पार्श्वभूमीवर गावी जाता येत नसेल व त्यांना जेवणाची सोय नसेल त्यांनी पर्सनल व्हाट्सअप नंबर वर संदेश द्यावा. दररोज दुपारी नारायण पेठ पुणे या ठिकाणी लॉकडाऊन संपेपर्यंत त्यांना फुड पॅकेटची व्यवस्था मोफत करण्यात येईल, असे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र खेडकर यांनी कळविले आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातून इच्छुक असलेल्या खेडेकर यांनी या मोबाईलवर 9822870120 संपर्क करण्यास सांगितले आहे. विद्यार्थी उपाशी राहू नये, या अभियानाचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.