Pune : गंजपेठेत पाच दुचाकी जाळून खाक : अज्ञात व्यक्तीने पेटवल्याचा संशय

एमपीसी न्यूज- रस्त्यावर उभ्या केलेल्या पाच दुचाकी आगीमध्ये जाळून खाक झाल्या. ही घटना आज पहाटे ३ च्या सुमारास गंज पेठ, नाल्याजवळ घडली. अज्ञात व्यक्तीने या दुचाकी पेटवून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने धाव घेत आग आटोक्यात आणली. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडक पोलीस तपस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.