Pune : भरधाव टँकरच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज- भरधाव वेगातील टँकरच्या चाकाखाली सापडून एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉलसमोर आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

नवीन चंद्राबी (वय ३१) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे़.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन चंद्राबी बाजीराव रस्त्यावरील स्टेट बँकेत ते कामाला होते़. आज सकाळी धायरीकडून स्वारगेटच्या दिशेने दुचाकीवरून निघाले होते़. त्यांनी हेल्मेटही घातलेले होते़.

अभिरुची मॉलसमोर आले असता शेजारून जाणाऱ्या टँकर चालकाने चुकीच्या पद्धतीने वाहन चालवल्याने ते मागच्या चाकाखाली सापडले. त्यात चंद्राबी यांचा जागीच मृत्यू झाला. टँकरचालक शकील सय्यद इटगी याला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे़.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.