BNR-HDR-TOP-Mobile

Pune : कुऱ्हाडीने मारहाण करून दुचाकीस्वाराला लुटले ; 73 हजारांचा ऐवज नेला चोरुन

एमपीसी न्यूज – चोरट्याना त्यांचा चोरीचा डाव साध्य करता न आल्याने आणि फिर्यादीने केलेल्या प्रतिकाराचा राग येऊन त्यांना कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली . तसेच 73 हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना रविवारी (दि.30) रात्री पावणे दहाच्या दरम्यान उंड्री मंतरवाडी रोड येथे घडली.

याप्रकरणी सुनिल चव्हाण (वय 46, रा.सैनिकपुरी, हैदराबाद) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनिल हे त्यांच्या दुचाकीवर जात असताना पाठीमागून तिघेजण दुचाकीवर आले. त्यातील एकाने सुनिल यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्त हिसका देऊन तोडली. दरम्यान सुनिल यांनी लाथा मारून त्यांना दूर केले असता त्या चोरट्यानी सुनिल यांना खाली पाडून त्यांच्या पायावर कुऱ्हाडीने मारहाण करून जखमी केले. त्यांच्या खिशातील मोबाईल, रोख रक्कम आणि बँकेचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड असा एकूण 73 हजारांचा ऐवज चोरून नेला.

याप्रकरणी तीन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3