Pune : शहरात दोन कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू, मृतांचा एकूण आकडा 31 वर

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 267

एमपीसी न्यूज – पुण्यात आज (रविवारी) दोन कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधित मृतांची एकूण संख्या 31 झाली आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या वाढून 267 झाली आहे. 

कोरोनाबाधित मृतांमध्ये संगमवाडी परिसरातील 58 वर्षीय महिलेचा आणि सोमवार पेठेतील 56 वर्षीय महिलेचा समावेश आहे. दोन्ही रुग्णांना कोरोनाशिवाय इतर आजारही जडलेले होते. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधित मृतांच्या संख्येत दोनने वाढ झाली आहे. शहरात एकूण 31 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असली. तरी त्यातील 29 जण हे पुणे जिल्ह्यातील रहिवासी असून एकजण ठाण्याचा तर एकजण नगरचा रहिवासी होता, असे सांगण्यात येत आहे. जिल्ह्याबाहेरील हे दोन्ही रुग्ण ससून रुग्णालयात उपचार घेत होते. 

पुणे जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 267 वर गेली आहे. पुणे शहरात 225, पिंपरी- चिंचवडमध्ये 30 तर, ग्रामीण भागात 12 रुग्ण आहेत. पुणे जिल्ह्यात काल रात्रीपर्यंत 254 कोरोनाबाधित रुग्ण होते. त्यात आज 13 रुग्णांची भर पडली आहे.

पुण्यातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर जगात सर्वाधिक

पुण्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूची टक्केवारी जगात सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. एकूण 267 रुग्णांपैकी 31 जणांचा मृत्यू झाला असून ही टक्केवारी 11.61 टक्के आहे. सर्वाधिक मृतांचा आकडा हा ससून रुग्णालयातील आहे. आतापर्यंत ससून रुग्णालयात 23 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ही काळजी वाढविणारी घटना आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.