Pune : किरकोळ कारणावरून 10 ते 12 जणांकडून तरुणास हॉकी स्टीकने मारहाण

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून 10 ते 12 जणांकडून तरुणास हॉकी स्टीकने आणि कोयत्याने मारहाण केल्याची घटना काल शुक्रवारी (दि.28) रात्री साडेदहाच्या दरम्यान एरंडवणा येथील सोनल हॉलजवळील गल्लीमध्ये घडली.

याप्रकरणी सुमित शेडगे (वय 20,रा.एरंडवणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुमित याने शुक्रवारी (दि. 29) रात्री सोनल हॉल जवळील गल्लीमध्ये गाडी अंगावर घातल्याचा जाब विचारल्यामुळे त्याचा राग मनात धरून सुमित आणि त्याच्या साथीदाराला जवळपास 10 ते 12 अनोळखी इसमांनी लोखंडी कोयत्याने आणि हॉकी स्टिकने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत फिर्यादी आणि त्याचा साथीदार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी मारहाण करणाऱ्या अज्ञात 10 ते 12 इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास डेक्कन पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.