BNR-HDR-TOP-Mobile

Pune : इस्टेट एजंटच्या खून प्रकरणी दोन तरुणांना अटक

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- पुण्यात कात्रज भागामध्ये अजयकुमार सीताराम जैसवाल या इस्टेट एजंटच्या खून प्रकरणी दोन तरुणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. कात्रज परिसरातील सच्चाई माता डोंगरावरील फार्म हाउसमध्ये कोयत्याने वार करून जैसवाल याचा सोमवारी (दि. 20) रात्री खून करण्यात आला होता.

विनायक उर्फ चिंटू कुमार कुर्तकोटी (वय 28 रा. मेगा सिटी कोथरूड) व अविनाश दीपक जाधव (वय 21) अशी या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर आरोपी हे कोथरूडच्या चांदणी चौकात येणार असल्याची माहिती मिळाली होती. याठिकाणी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खून केल्याची कबुली दिली आहे. भारती विद्यापीठ पोलीस तपास करीत आहेत. खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही

HB_POST_END_FTR-A2

.