Pune : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – शरद पवार बुधवारी एकाच व्यासपीठावर

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार प्रथमच बुधवारी (दि. 25 डिसेंबर) एकाच व्यासपीठावर येणार आहेत. याला निमित्त आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 43 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे, हे दोघेही नेते एकत्र येत असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा आहे.

मागील अनेक वर्षांपासून साखर उद्योग अडचणीतून जात आहे. सहकार मंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दिलिप वळसे पाटील यांच्यासह इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत. साखरेच्या प्रति क्विंटलचा निर्धारित दर 3100 रुपये आहे, तो किमान 3300 रुपये करण्याची साखर उद्योगाची मागणी आहे. तर, साखरेसाठी द्विस्तरीय किंमत धोरण राबविण्याची मागणी आहे. यावर मंथन करून राज्य शासन केंद्र शासनाला कसा पाठपुरावा करणार याकडे, साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.