Pune : आता नव्याने समाविष्ट गावांतील अनधिकृत बांधकामांनादेखील मिळकत करआकारणी

एमपीसी न्यूज- महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांतील अनधिकृत बांधकामांनादेखील मिळकत करआकारणी करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.

यामध्ये समाविष्ट झालेल्या गावांमध्ये गावठाण, गायरान या भागामध्ये मिळकतीवरील इमारतींना करआकारणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये गायरान किंवा गावठाण असल्यास तसेच राज्य शासनाकडे नोंद असल्यास खरेदीखत होत नाही. अशा ठिकाणच्या मिळकतींना जे राहत आहेत किंवा ज्याच्याकडे जुनी टॅक्स पावती, वीज मीटर, मतदान नोंदणी कार्ड, संमतिपत्र किंवा रजिस्टर कुलमुखत्यार अशी कागदपत्रे घेऊन करआकारणीबाबत मागविलेल्या प्रशासनाच्या अभिप्रायाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.