Pune : महापालिकेच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर लवकरच हातोडा पडणार

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका हद्दीतील आणि नव्याने समाविष्ट झालेल्या गांवामधील बहुमजली अनधिकृत बांधकामे हायरीच जॉ-क्रशर, माऊटेड, एसकॅव्हेटर या मशिनरीच्या सहाय्याने पाडण्याची निवीदा स्थायी समितीने मंजुर केली आहे. त्यामुळे पालिकेच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर लवकरच हातोडा पडणार आहे.

शहर, उपनगर आणि पालिका हद्दीत नव्याने समावेश झालेल्या 11 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झालेली आहेत. तर उपनगर आणि समाविष्ट गावांमध्ये आजही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत.

समाविष्ट गावांमध्ये सुरू असलेल्या बहुमजली बांधकामांना ग्रामपंचायत परवानगी असल्याचे सांगून सदनिका विक्री केल्या जातात. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणुक होते. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने बहुमजली अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाच्या अनुषंगाने अनधिकृत बांधकामे व बहुमजली इमारती मशिनच्या सहाय्याने पाडण्यासाठी पालिका प्रशासनाने निवीदा मागविल्या होत्या. यासाठी तीन निवीदा आल्या होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.