Pune : इमारतींच्या टेरेसवर चालणार्‍या अनधिकृत हॉटेल्सवर कारवाई होणार

एमपीसी न्यूज – शहरातील विविध इमारतींच्या टेरेसवर चालणार्‍या अनधिकृत हॉटेल्सची पाहणी करण्याचे काम महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून सुरु केले आहे. संबंधित हॉटेल्सना नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती बांधकाम विभागातील अधिकार्‍यांनी दिली आहे.

महापालिका क्षेत्रातील अनेक अनेक ठिकाणी इमारतींच्या टेरेसवर आणि पार्किंगमध्ये अनधिकृतपणे हॉटेल व्यावसाय चालविले जातात. संबंधित हॉटेल व इमारत मालकांना वारंवार नोटीस देऊनही अशा हॉटेलची संख्या कमी होताना दिसत नाही.

  • दरम्यान, 31 डिसेंबर 2017 रोजी मुंबईतील एका इमारतीच्या टेरेसवर सुरू असलेल्या हॉटेलला आग लागली होती. या घटनेत 35 ग्राहकांचा मृत्यु झाला होता. या घटनेनंतर सर्वच शहरांमधील प्रशासनाने आपल्या शहरातील इमारतींच्या टेरेसवर सुरु असलेल्या हॉटेल्सवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली होती. मात्र, या घटनेचा विसर पडल्यानंतर पुन्हा शहरातील विविध इमारतींच्या टेरेसवर जोमाने हॉटेल्स सुरू झाली आहे.

दुसरीकडे विमाननगर परिसरात उंच इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेल्या अनधिकृत नऊ हॉटेलवर कारवाई करण्याचे पत्र पोलिस खात्याने पालिका प्रशासनाला दिले आहे. पत्र्याचे छत आणि मंडप टाकून ही हॉटेल चालविली जातात. या पार्श्‍वभूमीवर पालिकेच्या बांधकाम विभागाने शहरातील विविध भागांमध्ये टेरेसवर सुरू असलेल्या हॉटेल्सची पाहणी करून संबंधितांना नोटीस दिल्या जाणार आहेत, असे सांगितले आहे.

  • त्यानंतरही ते सुरूच राहिल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी इमारतींच्या पार्कींगमध्ये अनधिकृतपणे सुरू असलेल्या हॉटेल्सनाही नोटीस दिल्या जाणार असल्याचे बांधकाम विभागातील एका वरीष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.