Pune : ‘कवि-भूषण के छंद’ या ध्वनिमुद्रिकेचे बुधवारी प्रकाशन

एमपीसी न्युज – उद्गार संस्थेच्या वतीने कवी भूषण यांचे शिवभूषण मधील निवडक छंद व त्यांचा हिंदीमध्ये अर्थ या स्वरूपात कवि-भूषण के छंद या ध्वनिमुद्रिकेचे उद्या (दि.19) पुण्यात लालमहाल येथे शिवजयंती निमित्त प्रकाशन होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे उत्तुंग कार्य त्यांच्या समकालीन साहित्यिकांच्या दृष्टीकोनातून घरोघरी पोहोचविण्यासाठी उद्गार संस्थेने पुढाकार घेतला आहे. कवी भूषण यांचे शिवभूषण मधील निवडक छंद (ब्रज भाषेतले) व त्यांचा हिंदीमध्ये अर्थ या स्वरूपात ‘कवि-भूषण के छंद’ या ध्वनिमुद्रिकेची संस्थेने निर्मिती केली आहे. शिवजयंतीचे औचित्य साधून (दि.19) या ध्वनिमुद्रिकेचे अमित गायकवाड यांच्या हस्ते लालमहाल येथे सकाळी साडेआठ वाजता प्रकाशन होणार आहे.

ध्वनिमुद्रिकेसह एक पुस्तिकाही देण्यात येणार असून यामध्ये ‘शिवा बावनी ‘मधील सगळे छंद समाविष्ट करण्यात आले आहेत. या ध्वनिमुद्रिकेसाठी संहिता लेखन आणि छंदपठण हर्ष परचुरे यांनी केले असून निवेदन आणि अर्थाचे निरुपण आसावरी पाटणकर यांनी केले आहे. यासाठी सुजीत भोगले यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.