Pune : 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ‘काका’ने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला; ‘पुतण्या’ने उघडपणे दिला!

एमपीसी न्यूज – 2014 च्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण निकाल जाहीर होण्याआधीच, केवळ भाजप मोठा पक्ष म्हणून उदयास आल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाहेरून पाठिंबा दिला होता. जे पेरलं तेच उगवल्याचे सांगत अजित पवार (पुतणे) यांनी भाजपला उघडपणे पाठिंबा देऊन उपमुख्यमंत्री पद पदरात पडून घेतले. आशा प्रकारची चर्चा पुण्यात सुरू झाली आहे. यामध्ये सर्वात गोची शिवसेनेची झाली आहे.

_MPC_DIR_MPU_II

शेवटपर्यंत अजित पवार बैठकीला हजर असताना त्यांनी एका रात्रीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पुणे जिल्हा हा शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आता शरद पवार यांच्या सोबत जावे की, अजित पवार यांच्या सोबत असा कार्यकर्यांना प्रश्न पडला आहे. काँगेस-राष्ट्रवादी-शिवसेना महाशिव आघाडीची सत्ता येण्याचे अंतिम असताना अजित पवार यांनी टाकलेल्या डावामुळे भल्याभल्यांची झोपच उडाली आहे.

पुणे महापालिकेत राष्ट्रवादीचे 41 नगरसेवक आहेत. त्यातील बहुतांशी नगरसेवकांवर अजित पवार यांची पकड आहे. शिवाय जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आहे. जिल्ह्यातील पंचायत समित्या, बाजार समित्या, बँका, सोसायट्यांवर राष्ट्रवादीचीच एक हाती सत्ता आहे. अद्यापही अजित पवार यांना समजाविण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी फुटणार की, अजित पवार माघारी येणार?, याकडे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.