Pune : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत निकिताने मिळवले 94.4 टक्के गुण

Under extremely adverse conditions, Nikita scored 94.4 per cent marks : तिचे वडील नागरिकांच्या गाड्या धुण्याचे काम करतात

एमपीसी न्यूज – गरीब कुटुंबातील सामान्य कामगाराच्या मुलीने रात्रंदिवस अभ्यास करून 10 वीच्या परीक्षेत 94.4 टक्के मार्क मिळविले. तिचे वडिल लोकांच्या गाड्या धुवून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर कुटुंबाचा गाडा चालवतात.

अरण्येश्वर येथे राहणाऱ्या निकिता राजू लंगोटे हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभ्यास करून दहावीच्या परीक्षेमध्ये 94.3 40% मार्क मिळविले आहेत.

तिचे वडील राजू लंगोटे हे परिसरातील नागरिकांच्या गाड्या धुण्याचे काम करतात. त्यांचे हेच एकमेव उत्पन्नाचे साधन आहे.

अतिशय छोट्या घरात निकिता आपले आई वडील आणि भावासह राहते. अशा घरात राहून निकिता हिनी 10 वी मध्ये यशस्वीपणे यश संपादन केले आहे.

अत्यंत सामान्य कुटुंबातील या मुलीने हे यश संपादन केल्याबद्दल नगरसेविका अश्विनी कदम आणि नितीन कदम यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.