Pune : ‘सीबीएसई’च्या अभ्यासक्रमातून नागरी अधिकाराचे धडे वगळण्याचा निर्णय दुर्दैवी : ॲड. अभय छाजेड

Unfortunately, the decision to exclude civil rights lessons from CBSE syllabus: Adv. Abhay Chhajed :

एमपीसी न्यूज – ‘सीबीएसई’च्या अभ्यासक्रमातून नागरी अधिकाराचे धडे वगळण्याचा निर्णय हा अत्यंत दुर्दैवी आहे. येणाऱ्या नवीन पिढीला धर्मनिरपेक्षता, नागरिकता, लोकशाही अधिकार कळू द्यायचेच नाही की काय? अशा पध्दतीने शंका येणारा हा निर्णय असून त्याचा निषेध करीत असल्याचे प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड.अभय छाजेड यांनी म्हटले आहे
.
वास्तविक लोकशाही राज्यात मूलभूतपणे राज्यघटनेचे स्वरूप, संघराज्य रचना, लोकशाही अधिकार, नागरी स्वातंत्र्य हे विषय तरुण मुलांना शिकविणे अपेक्षित आहे. मात्र, कोरोना महामारीचा फायदा घेऊन अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय सीबीएसई बोर्डाने घेतला आहे.

हा भाग कोणाच्या सांगण्यावरून वगळला गेला, हे लोकांना कळले पाहिजे, अन्यथा ज्यांनी निर्णय घेतला त्यांच्यावर केंद्र सरकारने कारवाई केली पाहिजे, अशी मागणी ॲड. छाजेड यांनी केली आहे.

कोरोना महामारीचा फायदा घेऊन केंद्र शासनाने कामगार कायद्याच्या संदर्भात कामगारांचे हक्क कमी करण्याची भूमिका घेतली.

सहकारी बँकांचे नियंत्रण रिझर्व्ह बँकेकडे घेणे, संरक्षण क्षेत्रापासून ते अवकाश क्षेत्रापर्यंत सर्वच क्षेत्रांत खाजगीकरण करण्यासाठी गुंतवणूक आणणे, रेल्वेचे काही रुट्स खाजगी लोकांना देण्यासाठी निर्णय घेणे, पेट्रोल – डिझेलची भाववाढ सातत्याने करणे, अशा पध्दतीने मनमानी निर्णय घेतलेले आहेत.

आता त्याचाच पुढचा टप्पा हा शिक्षण क्षेत्रातील हस्तक्षेप हा आहे. केंद्र सरकारने अभ्यासक्रम कमी करायचा असेल तर जरूर करावा, पण मूलभूत शिक्षणावर अतिक्रमण करू नये. हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणीही ॲड. छाजेड यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.