Pune : पूरग्रस्तांसाठी युनिक इंग्लिश मिडीयम स्कूलचा मदतीचा हात

एमपीसी न्यूज- सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात म्हणून ईगल एज्युकेशन सोसायटीचे युनिक इंग्लिश मिडीयम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज यांच्यातर्फे जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. धान्य, कपडे, टिकाऊ कोरडे अन्नपदार्थ, चादर, शाल, रग, स्वेटर असे मदतीचे स्वरूप होते.

रविवारी (दि. 25) ही मदत शाळेच्या वाहनांनी सांगली आणि कोल्हापूरकडे रवाना करण्यात आली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आर ए. मुलाणी, प्राचार्य सौ.जयश्री जाधव, उपप्राचार्य सुनीता चांदगुडे व संस्थेच्या पदाधिकारी डॉ. तस्नीम मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक,कर्मचारी, पालकवर्ग व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.