Pune University: सामान्य नागरिकांसाठी मोबाईल व्हिडीओ निर्मिती कार्यशाळा

एमपीसी न्यूज:  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागातर्फे सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध विषयांवरील अल्पकालीन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. (Pune University) त्या अंतर्गत मोबाईल व्हिडिओनिर्मिती कार्यशाळा दि. 22 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट 2022 या काळात दररोज संध्याकाळी सहा ते आठ या वेळात फर्ग्यूसन रस्त्यावरील रानडे इन्स्टिट्यूट परिसरात विभागाच्या सभागृहात होणार आहे. जेष्ठ टीव्ही पत्रकार प्रतिभा चंद्रन कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.

 

कार्यशाळेसाठी रू. 2000 शुल्क असून 12 उत्तीर्ण झालेली कोणतीही व्यक्ती प्रवेश घेऊ शकते. कार्यशाळेसाठी चांगल्या प्रतीचा व्हिडिओ कॅमेरा असलेला मोबाईल फोन सहभागींकडे असणे आवश्यक आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर एका तुकडीत फक्त वीस जणांना प्रवेश दिला जाईल. सहभागींना उपस्थितीचे प्रमाणपत्र देण्यात येईल. विद्यापीठाच्या www.unipune.ac.in या संकेतस्थळावर ‘कॉन्फरन्सेस अँड वर्कशॉप’ या सेक्शनमध्ये कार्यशाळेचा प्रवेश अर्ज उपलब्ध आहे.

Pimpri Crime: दोन टोळक्यांमध्ये हाणामारी पोलिसात परस्परविरोधी गुन्हा दाखल

पुढील काळात पॉडकास्ट निर्मिती, सोशल मीडिया मार्केटिंग यांसंबंधी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी या क्रमांकावर ८४०८०५७८९२  संपर्क साधावा अशी माहिती संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख डॉ.उज्वला बर्वे यांनी दिली.

 

अर्ज करण्यासाठी लिंक

https://events.unipune.ac.in/apps/applicant/login.aspx

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.