Pune University Cancel Fee Hike : पुणे विद्यापीठाचा शैक्षणिक शुल्कवाढीचा निर्णय एक वर्षासाठी स्थगित

Pune University's decision to increase tuition fees postponed for one year

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने येणाऱ्या शैक्षणिक वर्षाची फी वाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठ व्यवस्थापनाच्या आज  (सोमवारी)  झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 

पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आज (सोमवारी) झालेल्या बैठकीत विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील सर्व अनुदानित व विना अनुदानित अभ्यासक्रमाच्या शुल्क वाढीच्या निर्णयास एक वर्षासाठी स्थगित करण्यात आले  आहे.

या बैठकीत विद्या परिषदने सादर केलेल्या शुल्क वाढ न करण्याचा प्रस्तावावर चर्चा करत, सर्वानुमते हा निर्णय संमत करण्यात आला.

कोरोनामुळे सर्वच स्थरातील नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच अशा परिस्थितीत 20 ते 30 टक्के वाढ करणे योग्य राहणार नाही.

त्यामुळे, विविध विद्यार्थी संघटनांनी याबाबत विरोध दर्शवला होता. विद्यापीठाने शुल्क वाढ न करण्याचा घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.