Pune University: पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हात सत्यशोधक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची मुद्रा समाविष्ट करण्याची मागणी

एमपीसी न्यूज : पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हात सत्यशोधक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची मुद्रा समाविष्ट करण्यात यावी या मागणीसाठी शनिवारी 6ऑगस्टला आकुर्डीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. (Pune University) याबाबत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ कारभारी काळे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बोधचिन्ह कृती समितीने विद्यापीठाच्या बोधचिन्हात सत्यशोधक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची मुद्रा समाविष्ट करण्यात यावी या मागणीसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ कारभारी काळे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे. (Pune University) याविषयीची जनजागृती करण्यासाठी येत्या शनिवारी 6 ऑगस्ट ला  दुपारी 3.30 वा आकुर्डीतील श्रमशक्ती भवन याठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

PCMC News: महापालिकेच्या शाळेतील मुलांना मिळणार गणवेश; खरेदीस प्रशासकांची मान्यता  

या मेळाव्यास जेष्ठ नेते डॉ.भारत पाटणकर व मानव कांबळे मार्गदर्शन करणार आहेत तरी या मेळाव्यास शहरातील समविचारी पक्ष – संघटना व सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन समितीच्या वतीने माजी नगरसेवक मारूती भापकर यांनी केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.