Pune University : जागतिक समस्या सोडवण्यासाठी जागतिक लोकशाही प्रस्थापित व्हावी; उगो अस्तुटो:  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात युरोपियन युनियन दिवस साजरा

एमपीसी न्यूज – हवामान बदल हे जागतिक आव्हान आहे ज्याला जागतिक प्रतिसादाची गरज आहे.  याआधी आपण जो विकास केला तो शाश्वत कसा होईल यावर आपण लक्ष केंद्रित करायला हवे. यासाठी जगाने एकत्र येत यावर मार्ग काढायला हवा असे मत युरोपियन युनियनचे आणि भूतानचे भारतातील राजदूत उगो अस्तुतो यांनी व्यक्त केले.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्रातर्फे ११ मे  रोजी युरोपियन युनियन स्थापना दिवसाचे औचित्य साधून एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी  ‘ईयू आणि भारत ग्रीन, डिजिटल आणि रेसिलेंट फ्युचर’ या विषयावर अस्तुतो यांनी आपले विचार मांडले.

 

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे,  युरोपियन युनियनचे भारतातील शिष्टमंडळाच्या आर्थिक व्यवहार प्रमुख आणि व्यापार समुपदेशक रेनिता भास्कर तसेच  टीम लीडर प्रकाश नायक,  आणि उच्च शिक्षणतज्ज्ञ संजीव रॉय आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कोविड महामारीने सुरू केलेला डिजिटल संक्रमणाचा पाया दर्जेदार पायाभूत सुविधांवर आधारित हवा. आर्थिक आणि
 तंत्रज्ञानातील नावीन्य हे महत्त्वाचे आहे परंतु त्याच वेळी कॉर्पोरेट कंपन्यांकडून ठेवले जाणारे नियंत्रण हाही मुद्दा येथे महत्वाचा आहे. यासाठी वैश्विक दृष्टीकोन ठेवत त्यावर काम व्हायला हवे.

युरोपियन युनियन मधील  इरास्मस प्रकल्पांतर्गत सुमारे ६ जाहीर भारतीय विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन करत आहे.
यावेळी डॉ. विजय खरे यांनी भारत आणि युरोपियन युनियन यांच्या संबंधावर प्रकाश टाकला.
गेल्या पाच वर्षांत दुसऱ्यांदा आपण विद्यापीठात युरोपियन युनियन दिवस साजरा करत आहोत.  आम्ही विद्यापीठातर्फे एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशनच्या माध्यमातून शाश्वत ऊर्जा, सांडपाणी व्यवस्थापन, कृषी, आरोग्य सेवा, भौतिकशास्त्र आणि ऑटोमेशन आदी पर्यावरणीय दृष्टीने महत्वाच्या विषयांवर काम करत आहोत, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. नितीन करमळकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.