Pune university News : युवा सेनेच्या प्रत्नातून बीएस्सी तिसऱ्या वर्षाच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

एमपीसीन्यूज :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत बीएस्सी तिसऱ्या वर्षाच्या चतुर्थ सत्राच्या नुकत्याच पार पडलेल्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान Chemistry lll या विषयाच्या परीक्षेसाठी लॉग इन करुन देखील गैरहजर दाखविण्यात आलेल्या सहाशे विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या पाठपुराव्यामुळे दिलासा मिळाला आहे. या विद्यार्थ्यांची ऑगस्टमध्ये पुन्हा परीक्षा घेण्याचे आश्वासन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने घेतला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ युवासेना कक्षाचे उपाध्यक्ष विशाल हुलावळे म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत बीएस्सी तिसऱ्या वर्षाच्या चतुर्थ सत्राच्या नुकत्याच ऑनलाईन परीक्षा झाल्या. दि .14 जुलै रोजी दुपारी 12  ते 2 च्या दरम्यान झालेल्या BSc तिसऱ्या वर्षाच्या Chemistry lll च्या पेपर वेळी गोंधळ निर्माण झाला होता. 12.05 वाजता ज्या विद्यार्थ्यांनी log in करून पेपर दिला त्या विद्यार्थ्यांना त्या पेपरमध्ये गैरहजर (Absent) दाखविण्यात आले. संबंधित विद्यार्थ्यांनी  ऑनलाइन तक्रार नोंदवली.

मात्र, तरीही अद्याप त्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण विद्यापीठाकडून देण्यात आलेले नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थी तणावाखाली आहेत.  याबाबत लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन या सर्व विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यासंदर्भात  तारीख जाहीर करावी, अशी मागणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ युवासेना कक्षाने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे निवेदनाद्वारे केली. कक्षाचे अध्यक्ष कुणाल धनवडे, सरचिटणीस परमेश्वर लाड, उपाध्यक्ष विशाल हुलावळे, सचिव दयानंद कोंढरे आणि सहसचिव रोहित कुचेकर यांच्या निवदेनावर स्वाक्षऱ्या आहेत.

दरम्यान, परीक्षा संचालक महेश काकडे, परीक्षा विभाग समन्वयक योगेश नेरकर यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. जवळपास 600 विद्यार्थ्यांना या समस्येला सामोरे जावे लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर अशा सर्व विद्यार्थ्यांना ईमेलद्वारे ऑनलाईन परीक्षा संदर्भात माहिती पाठवली जाईल. तसेच ही परीक्षा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ युवासेना कक्षाला दिल्याची माहिती विशाल हुलावळे यांनी दिली.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.