PHD Entrance: पुणे विद्यापीठाची पीएच.डी प्रवेश प्रक्रिया कार्यान्वित, संशोधन केंद्रांकडून रिक्त जागांची माहिती मागवली

एमपीसी न्यूज: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्ष 2022-23 ची पीएच.डी प्रवेश प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली असून त्या (PHD Entrance) अंतर्गत विद्यापीठाशी संलग्न सर्व शैक्षणिक विभाग व संशोधन केंद्र यांच्याकडून मान्यताप्राप्त संशोधन मार्गदर्शकांकडील रिक्त जागेचा तपशील घेण्यात येत आहे.

Pune University: पाली व बुद्धिस्ट अध्ययन विभागाचा विशेष अभ्यासक्रम, भाषातज्ज्ञ प्रा.गणेश देवी करणार मार्गदर्शन

याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 30 जुलै रोजी परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे. संशोधन केंद्रातील मान्यताप्राप्त मार्गदर्शकांकडे रिक्त असलेल्या जागांकरिता ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी विद्यापीठाच्या संकेस्थळावर जात https://bcud.unipune.ac.in/root/login.aspx या लिंकवर जात 20 ऑगस्ट 2022 पर्यंत ही माहिती मान्यताप्राप्त पीएचडी मार्गदर्शकांनी भरायची आहे. (PHD Entrance) व त्यानंतर मान्यताप्राप्त संलग्नित संशोधन केंद्रांनी 24 ऑगस्ट पर्यंत ही माहिती भरायची आहे. यासाठीची सर्व प्रक्रिया तसेच नियम यांची माहिती परिपत्रकात देण्यात आली आहे. हे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेस्थळावर उपलब्ध आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.