Pune University : 2020-21 च्या परिक्षा शुल्कात कोणतीही वाढ न करण्याचा पुणे विद्यापीठाचा निर्णय

एमपीसी न्यूज – शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील परिक्षांचे परिक्षा शुल्क व अनुषांगिक शुल्कात कोणतीही वाढ न करण्याचा पुणे विद्यापीठाने निर्णय घेतला आहे. प्रथम आणि द्वितीय सत्राच्या सर्व अभ्यासक्रमासाठी हा निर्णय लागू राहणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या आर्थिक अडचणीमुळे विद्यापीठाने शुल्क वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील शैक्षणिक वर्ष 2019-20 प्रमाणेच परिक्षा व अनुषांगिक शुल्क आकारले जाणार आहे.

सर्व संलग्न महाविद्यालये व मान्यताप्राप्त संस्थांनी या निर्णयाचे पालन करण्याचे आवाहन परिक्षा व मूल्यमापन मंडळाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.