Pune University : धक्कादायक ! पुणे विद्यापीठातील 21 सुरक्षा रक्षकांना कोरोनाची बाधा

विद्यापीठात एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर मागील काही महिन्यांसाठी विद्यापीठ पूर्णपुणे बंद ठेवण्यात आले होते. : Shocking! Corona strikes 21 security guards at Pune University

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तब्बल 21 रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यापीठात एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर मागील काही महिन्यांसाठी विद्यापीठ पूर्णपुणे बंद ठेवण्यात आले होते. तरीही 21 सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, हे सर्व सुरक्षारक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडले असले तरी त्यांच्यात कोणतीही लक्षणे नसल्यामुळे त्यांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुणे विद्यापीठातील एक सुरक्षारक्षक गावावरून परत आल्यानंतर त्याच्यात ताप व थंडी या सारखी लक्षणे आढळून आली.

त्यानंतर तात्काळ त्याची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे आवारातील दोनशे सुरक्षा रक्षकांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 21 सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे माहिती समोर आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.