Pune Unlock 1.0 Update: उद्याने, तुळशीबाग, मंडई सुरू करण्याचा महापालिका प्रशासनाचा निर्णय 

Pune Unlock 1.0 Update: Municipal administration decides to start gardens, Tulshibagh, Mandai, Rs 500 fine for not using mask: Commissioner वाचा महापालिकेची नवी नियमावली आणि नवीन कनटेनमेंट झोनची यादी

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतेच असून, ते कमी करण्यासाठी महापालिकेने आणखी कठोर निर्णय घेतला आहे. पुण्यात मास्क वापरणे बंधनकारक असून, तो न वापरल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. हा दंड महापालिकाच वसूल करणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे. पहिल्या अनलॉकमध्ये महापालिकेची उद्याने, मंडई, तुळशीबाग सुरू करण्यात येणार आहे. उद्यानाची वेळ पहाटे 5 ते सायंकाळी 7 अशी राहणार आहे.

शाळा, महाविद्यालय, खाजगी क्लास, सलून, ब्युटीपार्लर, मॉल्स, हॉटेल्स, जलतरण तलाव, चितपटगृह, क्रीडांगणे बंदच राहणार असल्याचे आयुक्तांनी निक्षून सांगितले.

पुण्यातील 65 कंटेन्मेंट झोनमधून 27  झोन वगळण्यात आले आहे. 28 भाग नव्याने कंटेन्मेंट झोन होणार आहेत. 10 झोनची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहणार आहेत.

सर्व दुकाने, गॅरेज, वर्कशॉप सम – विषम पध्दतीने सुरू राहणार आहेत. दर 1 किलोमीटर अंतरावरील 5 दुकाने उघडण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. खाजगी आणि शासकीय कार्यालय नियमानुसार अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे.

दोन पथारी व्यवसायिकांमधील अंतर 10 मीटर वरून 5 मीटर करण्यात आले आहे. दिनांक 5 जूनपासून तुळशीबाग, हॉंगकॉंग लेन यासारखी गर्दीची ठिकाणे आणि रस्त्यांवरील दुकाने आळीपाळीने (P -1, P -2 पध्दतीने) मुख्य रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सम दिनाकाच्या दिवशी आणि दुसऱ्या बाजूची दुकाने विषम दिनाकाच्या दिवशी नियमाप्रमाणे उघडणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.