Pune Unlock News: ….असा राहील पुणे शहरातील अनलॉकचा नवा टप्पा!

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील अनलॉकच्या नव्या टप्प्याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काल (गुरुवारी) रात्री उशिरा नवीन आदेश जारी केला आहे. नवीन आदेश 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत लागू राहणार आहे.

नव्याने सुरु…
■      हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट आणि बार दि. 05/10 पासून 50% क्षमतेनुसार किंवा स्थानिक प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या क्षमतेनुसार सुरु राहील.
■     यासाठी पर्यटन विभागाकडून SOP निर्गमित करण्यात येईल, सदर कार्यप्रणालीनुसार कामकाज बंधनकारक असेल.

31 ऑक्टोबरपर्यंत बंद
■    शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस दिनांक 31 ऑक्टोबर अखेर बंद राहतील..
■    सिनेमा हॉल, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृह, सर्व प्रकारचे सभागृह आणि तत्सम जागा
■    सर्व प्रकारचे सामाजिक, धार्मिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांकृतिक, शैक्षणिक उपक्रम, सभा संमेलन, तत्मम मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊ शकतील, अशा प्रकारचे कार्यक्रम
■    सर्व धार्मिक स्थळे, सर्व धार्मिक कार्यक्रम, सभा, संमेलने

1) कोविड-19 च्या व्यवस्थापनाबाबतचे राष्ट्रीय निर्देश –

 •  मुखपट्टीचा वापर करणे – सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी तसेच प्रवास करताना मुखपट्टीचा/फेसमास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. मुखपट्टीचा वापर न केल्यास सदर व्यक्ती दंडनीय कार्यवाहीस पात्र राहील.
 • सामाजिक अंतर राखणे सार्वजनिक ठिकाणी सर्व व्यक्तींनी किमान 6 फुटांचे सामाजिक अंतर राखले पाहिजे. दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांमध्ये सामाजिक अंतर ( Social Distancing) राखणेची जबाबदारी संबंधित दुकानदारांची राहील. तसेच दुकानदार, दुकानामध्ये एका वेळेस 5 पेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश देणार नाहीत.
 • एकत्र जमणे – मोठी सार्वजनिक संमेलने / भव्य सभा यास नियमितपणे मनाई असेल. विवाहाशी संबंधित मेळावे 50 लोकांच्या उपस्थितीत साजरा करता येईल व अंत्यसंस्कार / अंत्यसंस्काराशी संवंधित मेळावे- 20 लोकांच्या उपस्थितीत करता येईल.
 •  सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हे संपूर्णत: प्रतिवंधित करण्यात येत आहे. उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती दंडाच्या शिक्षेस पात्र असेल. सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, गुटखा, धुम्रपान व मद्यपान करण्यास मनाई राहील.

2) कामाच्या ठिकाणाबाबत अतिरिक्त निर्देश –

 • घरातून काम करणे – शक्‍य असेल तेथवर घरून काम करणेची पद्धत अनुसरण्यात यावी. कार्यालये, कामाचे ठिकाणे, दुकाने, बाजारपेठा आणि औद्योगिक व वाणिज्यिक आस्थापना यामध्ये कामाच्या/ कामकाजाच्या वेळांची सुनियोजितपणे आखणी करावी .
 • परीक्षण (स्क्रिनिंग) व स्वास्थ – औष्णिक परीक्षण (थर्मल स्क्रिनिंग), हॅण्ड वॉश व सॅनिटायझर हे सर्व प्रवेशद्वाराजवळ व निर्गमन द्वाराजवळ आणि सामाजिक क्षेत्रात पुरविण्यात यावेत.
 •  वारंवार निर्जतुकीकरण ( सॅनिटायझेशन) – संपूर्ण कामास ठिवगणय, सामाजिक सविधांचे व मानवी संपर्कात येणार्‍या सर्व जागा थांचे, उदा: दरवाज्यांच्या मुठी ( डोअर हँडल) इ. चे कामाच्या पाळ्यांमध्ये वारंवार निर्जंतुकीकरण ( सॅनिटायझेशन) करण्याची सुनिश्चिती करण्यात यावी.
 •  सामाजिक अंतर राखणे – कामाच्या ठिकाणच्या सर्व प्रभारी व्यक्ती, कामगारांचे पुरेसे अंतर राखणे, कामाच्या पाळ्यांदरम्यान पर्याप्त अंतर ठेवणे, दुपारच्या जेवणाच्या वेळेत पुरेसे अंतर राखणे इ. द्वारे सामाजिक अंतर राखण्याची सुनिश्चिती करतील.

3) प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) –
कटेनमेंट झोनबाबत राज्य शासनाने दिनांक 19 मे, 2020 आणि दिनांक 21 मे, 2020 रोजी दिलेल्या आदेशातील अटी व शर्ती पुढील आदेशांपर्यंत कायम राहतील.  कंटेनमेंट झोन जाहीर करणे व त्याठिकाणी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनाकरिता केंद्र सरकार ब राज्य सरकारने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश/निर्देश यापुढे कायम राहतील.

प्रतिबंधित क्षेत्राबाबत पुणे महानगरपालिकेने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशातील सर्व
सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.

4) संपूर्णत: प्रतिबंधित करणेत येत असलेल्या बाबी 31 ऑक्टोबर 2020 अखेर – 

 •  शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस दिनांक 31 ऑक्टोबर 2020 अखेर बंद राहतील. तथापि, ऑनलाईन/ दुरस्थ शिक्षण (Distance Learning) सुरु राहील. तसेच ऑनलाईन शिक्षणास प्रोत्साहन द्यावे.
 •  सिनेमा हॉल ( मॉल व मार्केट कॉम्प्लेक्स मधील सिनेमागृहासह), जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृह, सर्व प्रकारचे सभागृह आणि तत्सम जागा बंद राहतील.
 • केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परवानगी शिवाय इतर सर्व आंतरराष्ट्रीय विमानप्रवास
 •  मेट्रो रेल्वे
 • सर्व प्रकारचे सामाजिक, धार्मिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांकृतिक, शैक्षणिक उपक्रम, सभा संमेलन व तत्सम मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊ शकतील अशा प्रकारचे कार्यक्रम, सर्व धार्मिक स्थळे, सर्व धार्मिक कार्यक्रम, सभा, संमेलने बंद राहील.

5) यापूर्वी परवानगी देण्यात आलेली सर्व अत्यावश्‍यक वस्तू व सेवा दुकाने सुरु राहतील.

6) पुणे महानगरपालिकेकडून यापूर्वी वेळोवेळी परवानगी देण्यात आलेल्या बाबी, त्याकरिता निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिनांक 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत सुरु राहतील.

7) हॉटिल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट व बार हे दिनांक 5 ऑक्टोबर 2020  पासून 50% क्षमतेनुसार अथवा स्थानिक प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या क्षमतेनुमार सुरु राहतील. याकरिता पर्यटन विभागाकडून SOP निर्गमित करण्यात येईल. सदर मार्गदर्शक कार्यप्रणालीनुसार कामकाज चालू ठेवणे बंधनकारक असेल.

8) ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना राज्याअंतर्गत तसेच राज्याबाहेर वाहतूक करणेसाठी वेळेचे कोणतेही बंधन असणार नाही. यावावत स्थानिक प्राधिकरणाने आवश्यक ती दक्षता घ्यावयाची आहे.

9) राज्यांतर्गत धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या केंद्र व राज्य शामनाने कोविड-19 बाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरु राहतील.

10) पुणे विभागातील लोकल रेल्वे गाड्या या MMR Region मधील मार्गदर्शक सूचना व कार्यपद्धतीनुसार सुरु राहतील. याकरिता पोलीस आयुक्त, पुणे शहर हे नोडल ऑफिसर राहतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.