Pune Unlock: कडक लॉकडाऊन संपला; चिकन-मटण दुकानांबाहेर रांगा

Pune Unlock: Strict lockdown over; Queues outside chicken-meat shops आखाड साजरा करण्यासाठी पुणेकरांचा उत्साह

एमपीसी न्यूज – कडक लॉकडाऊनची मुदत संपल्यानंतर आज (रविवार) पासून पुण्यात जीवनावश्यक वस्तूंचे व्यवहार सुरु होत आहेत. मंगळवारपासून श्रावण महिना सुरू होत असल्याने, आखाड साजरा करण्यासाठी दुकाने उघडण्यापूर्वीच पुणेकरांनी चिकन, मटणाच्या दुकानांसमोर गर्दी केल्याचे दृष्य सकाळी पहायला मिळाले. 

आजच्या दिवसासाठी लॉकडाऊनचे नियम बदलण्यात आले आहेत. महापालिका व पोलिसांच्या समन्वयातून आज दिवसभर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत सुरू राहणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

आज सकाळपासूनच अनेक दुकाने सुरू झाली असली तरी चिकन आणि मटणाच्या दुकानांसमोर मात्र रांगा लागलेल्या दिसत आहेत. यावेळी नागरिकांनी मात्र कोरोना अनुषंगाने घालून देण्यात आलेल्या नियमांचे पालन केलेलं आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करीत नागरिक रांगामध्ये उभे असल्याचे चित्र आहे. याशिवाय फळभाज्या घेण्यासाठीही नागरिकांनी गर्दी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.