Pune: एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्कवाढी विरोधात बेमुदत उपोषण

एमपीसी न्यूज – पुण्यातील एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला सुरवात केली. सन 2013 पासून शैक्षणिक शुल्कात प्रत्येक वर्षी 10 टक्के वाढ केली जात आहे. याशिवाय 2015 पासून प्रवेश शुल्कातही वाढ केली जात आहे. ही वाढ कमी करण्यात यावी, या मागणीसाठी एफटीआयआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी आजपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.

2013 पासून प्रत्येक वर्षी शैक्षणिक शुल्कात 10 टक्के वाढ केली जाते. त्यामुळे 2013 मध्ये जे शैक्षणिक शुल्क 55, 380 होते, ते 2020 मध्ये 1, 18, 323 पर्यंत पोहोचेल. त्याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कामध्येही 2015 पासून वाढ केली जात आहे. 2015 मध्ये प्रवेश शुल्क 1500 रुपये होते. ते आज 10 हजारांपर्यंत पोहोचले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना हा दरवाढीचा बोजा सहन करावा लागतो.

मागील तीन वर्षांपासून सतत ही बाब एफटीआयआय प्रशासनाच्या लक्षात आणून देऊन सुद्धा त्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे या विद्यार्थ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

ही शुल्कवाढ थांबावी. जोपर्यंत प्रवेश शुल्क कमी होत नाही, तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया थांबवावी. अन्यथा, उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.