Pune : एकनाथजी रानडे यांच्या उद्बोधनपर भाषणांचे संकलन असलेल्या ‘सेवा समर्पण ‘ ग्रंथाचे शनिवारी प्रकाशन

एमपीसी न्यूज- विवेकानंद केंद्राचे संस्थापक एकनाथजी रानडे यांच्या उद्बोधनपर भाषणांचे संकलन असलेल्या ‘सेवा समर्पण’ ( अध्यात्मिक जीवनाची साधना) ग्रंथाचे प्रकाशन शनिवारी (दि. 25) पुण्यात होणार आहे.

निवृत्त सनदी अधिकारी आणि ‘चाणक्य मंडल’चे संस्थापक अविनाश धर्माधिकारी, आणि ‘लोकमान्य मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी’चे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिर येथे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमात अविनाश धर्माधिकारी यांचे ‘प्रशासनातील सेवाभाव’ विषयावर व्याख्यान होणार आहे.

एकनाथजी रानडे यांनी जीवनव्रती प्रशिक्षणार्थींना वेळोवेळी केलेल्या उद्बोधनपर व्याख्यानांचे संकलन ‘सेवा समर्पण’ या ग्रंथात आहे. सुधीर जोगळेकर (मराठी प्रकाशन विभागाचे सचिव), जयंत कुलकर्णी (विवेकानंद केंद्र संचालक, पुणे शाखा) यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. या पुस्तकाचे लेखन सुनीता करकरे यांनी केले असून पुस्तकाचे संपादन निवेदिता भिडे यांनी केले आहे .

कन्याकुमारीतील शिलाखंडावरील विवेकानंद स्मारकाला 2020 साली 50 वर्षे होत आहेत तर विवेकानंद केंद्राच्या स्थापनेला 2022 साली 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागाने अनेक महत्वाकांक्षी प्रकाशनांची आखणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.