Pune : शहरी गरीब योजनेला 30 जूनपर्यंत मुदतवाढ -डॉ. रामचंद्र हंकारे

एमपीसी न्यूज – पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने शहरी गरीब योजनेला दि. 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली.

पुणे शहरातील गरीब वर्गास खाजगी रुग्णालयात उपाचारात ५० टक्के सवलत देणारी आणि डायलेसिससाठी १०० टक्के अनुदान देणाऱ्या शहरी गरीब आरोग्य योजनेतील लाभार्थ्यांना दि. ३१ मार्च पर्यंत वार्षिक लाभ दिला जातो. यानंतर लाभार्थ्यांना नुतनीकरणाचा अर्ज करावा लागतो.

यावर्षी योजनेची मुदत ३१ मार्च ऐवजी ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. सध्या महापालिकेच्या हद्दीतील सुमारे २० हजार नागरिक त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह या योजनेचे लाभार्थी आहेत. योजनेकरिता सन २०२०-२१ या आर्थिक वर्षांसाठी १ कोटी रुपयांची तरतूद महापालिकेच्या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.