Pune: शहरातील अनधिकृत होर्डिंग तातडीने काढा – आबा बागुल

एमपीसी न्यूज-पुणे शहरातील अनधिकृत होर्डिंग तातडीने काढा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आबा बागुल (Pune)यांनी पुणे मनपा आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे केली आहे.

मुंबईमध्ये अनधिकृत होर्डिंग पडल्याने अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. काही वर्षांपूर्वी पुणे शहरातील(Pune) जुन्या बाजाराजवळील होर्डिंग पडल्याने 3 निष्पाप पुणेकरांना जीव गमवावा लागला आहे. परंतु,  पुणे शहरात होर्डिंगची परिस्थिती पाहता अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डिंग असलेले निदर्शनास येत आहे. अश्या सर्व होर्डिंगवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आपण संधितांना द्यावेत.

Chinchwad : नॉव्हेल  इंटरनॅशनल स्कूलचा दहावीचा 100 टक्के निकाल

तसेच, अनधिकृत होर्डिंगची तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश द्यावेत. पुणे शहरातील अनधिकृत होर्डिंगवर तातडीने कारवाई न झाल्यास व या अनागोंदी कारभारामुळे पुणेकरांना जीव गमवावा लागला, तर त्याची सर्व जबाबदारी ही आपली राहील.  आपण यावर त्वरित कारवाई न केल्यास काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल याची नोंद घ्यावी, असेही बागुल यांनी निवेदनात म्हटले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.