Pune : सिव्हिल कोर्ट भूमिगत मेट्रो स्टेशनच्या भुयारी मार्गासाठी ‘न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड’चा वापर

Use of 'New Austrian Tunneling Method' for Underground of Civil Court Underground Metro Station :पुणे मेट्रोचे काम जोरात सुरू

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकट काळातही पुणे मेट्रोचे काम जोरात सुरू आहे. कामगारांची पुरेशी काळजी घेऊन हा प्रोजेक्ट सुरू आहे. पुणे मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट भूमिगत मेट्रो स्टेशनच्या भुयारी मार्गासाठी “न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड” (NATM) पद्धत वापरण्यात येत आहे आणि ह्या तंत्रज्ञानाद्वारे उत्खनन करण्यात येत आहे, अशी माहिती महामेट्रोच्यावतीने देण्यात आली.

अत्याधुनिक पद्धतीचे हे तंत्रज्ञान महामेट्रोतर्फे पुणे मेट्रोच्या कामासाठी वापरले जात आहे. सोबतच शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मार्गासाठी पुणेमेट्रोच्या स्वारगेट स्थानकाचे काम सुद्धा या विशेष तंत्रज्ञानाद्वारे प्रगतीपथावर असल्याचे महामेट्रोतर्फे सांगण्यात आले.

वणाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या दोन मेट्रो मार्गाचे कामही जोरात सुरू आहे. मेट्रोचे काम आता प्रत्यक्षात दिसून येत आहे. कर्वे रस्ता, पौड रस्ता, नदीपात्रातील व पिंपरी परिसरतील मेट्रोचे काम ठळकपणे दिसून येते.

या सोबतच शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाचे कामही लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे पुणे शहरातील बिकट झालेल्या वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

बालगंधर्व परिसरात मेट्रोचा कोच ठेवण्यात आला आहे. त्या ठिकाणी मेट्रोच्या कामाची इत्यंभूत माहिती देण्यात येते. मेट्रोचे काम हे पर्यावरणपूरक असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोनाच्या संकटामुळे मेट्रोचे काम काही दिवस थांबले होते. त्या पार्श्वभूमीवर कामगारांना विश्वासात घेऊन, काळजी घेऊन पुणे मेट्रोचे काम जोरात सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.