Pune Vaccination News : पुण्यात उद्या 73 केंद्रांवर लसीकरण; ‘या’ वयोगटातील नागरिकांना मिळणार दुसरा डोस

एमपीसीन्यूज : पुणे महापालिका हद्दीत 45 वर्षांवरील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, हेल्थ केअर वर्कर्स आणि आरोग्य कर्मचारी यांच्या लसीकरणासाठी उद्या, बुधवारी शहरात एकूण 73 केंद्र उपलब्ध असतील. 84 दिवसांपूर्वी पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला जाईल, अशी माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली.

लसीकरणासाठीची सर्व 73 केंद्र कोविशील्ड असतील. सर्व केंद्रांववरील लस केवळ दुसऱ्या डोससाठी उपलब्ध असेल. कुणालाही पहिला डोस दिला जाणार नाही, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कळविले आहे.

कोविशील्डच्या एकूण लसीकरणाच्या 10 टक्के डोस हे ऑनलाईन अपॉइंटमेंट/स्लॉट बुक केलेल्या 45  वर्षांवरील नागरिकांना दिले जातील. तर 90  टक्के डोस हे ‘वॉक इन’साठी देण्यात येणार आहेत.

तर 18  ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पूर्णपणे बंद असेल. त्यामुळे या वयोगटातील नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी करू नये, असे आवाहन महापौर मोहोळ यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.