Vadgaon Dhayari: निर्घृण खून करून ओळख पटू नये म्हणून जाळला तरुणाचा मृतदेह!

एमपीसी न्यूज – दगड डोक्यात घालून एका तरुणाचा निर्घृण खून करून ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  पुण्यात सिंहगड रोड परिसरातील सिंहगड कॉलेज परिसरात आज सकाळी आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

_MPC_DIR_MPU_II

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार शेळके यांनी या माहितीस दुजोरा दिला. सिंहगड महाविद्यालय परिसरातील एका टेकडीवर तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता संपूर्ण जळालेल्या अवस्थेत अंदाजे 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह त्या ठिकाणी आढळला. दगडाने चेहरा ठेचला असल्यामुळे अद्याप त्याची ओळख पटू शकली नाही, असे त्यांनी सांगितले.

पोलिसांनी शवविच्छेदनासाठी हा मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला आहे. संपूर्ण चेहरा दगडाने ठेचलेला असल्यामुळे ओळख पटविण्यात अडचण येत आहे.  सिंहगड रोड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.