Pune : ‘स्मार्ट सिटी अ‍ॅडव्हायजरी फोरम’ स्थापनेची खासदार वंदना चव्हाण यांची मागणी

स्मार्ट सिटी अ‍ॅडव्हायजरी फोरम’ स्थापनेसंदर्भात केंद्राला पत्र

एमपीसी न्यूज- केंद्र शासनाने ‘स्मार्ट सिटी योजनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटल्याप्रमाणे ‘स्मार्ट सिटी अ‍ॅडव्हायजरी फोरम’ची स्थापना अद्याप केली नसून, या फोरमची स्थापना 100 स्मार्ट शहरांमध्ये तातडीने करावी’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा सदस्य खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी केंद्र शासनाला पत्राद्वारे केली आहे. 1 ऑगस्ट 2018 रोजी त्यांनी केंद्रीय नगरविकास खात्याचे राज्यमंत्री हरदीप पुरी यांना याबाबत पत्र लिहिले आहे.

‘स्मार्ट सिटी योजनेची घोषणा केल्यावर 2015 मध्ये योजनेची मार्गदर्शक तत्त्वे केंद्र सरकारने ठरवली होती. त्यात योजनेतील 100 स्मार्ट शहरांमध्ये ‘स्मार्ट सिटी अ‍ॅडव्हायजरी फोरम’स्थापन केले जातील, असे म्हटलेले होते. प्रत्यक्षात पुण्यात सुद्धा असे ‘अ‍ॅडव्हायजरी फोरम’ स्थापन झालेले नाही, स्मार्ट सिटी योजनेच्या परिणामकारकतेवर वरच त्यामुळे अनिष्ट परिणाम होईल त्यामुळे हे फोरम तातडीने स्थापन करावे’, असे खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी या पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.