-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune : कोरोनाच्या संकट काळात कार्यरत असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना विविध सवलती

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकट काळात कार्यरत असणाऱ्या पुणे महपालिकेच्या कर्मचाऱ्यांना विविध सावलती देण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या महापालिका अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी 1 कोटीचे सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासह अनेक सवलतींना स्थायी समितीने मंजुरी दिल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

महापालिकेच्या अधिकारी -कर्मचारी यांना अंशदायी वैद्यकीय योजना कार्यान्वित आहे. त्यांच्या वेतनातून मे, जून, जुलै 2020 या महिन्यांमध्ये 1 टक्के प्रमाणे कपात न करता ती महापालिकेतर्फे भरण्यात येणार आहे. महापालिकेने करारनामा करून घोषित केलेल्या कोव्हीड 19 च्या पॅनेलवर कार्यरत असलेल्या दवाखान्यातून औषधोपचार घेतल्यास, होणाऱ्या एकूण बिलाच्या 10 टक्के रक्कम संबंधी अधिकारी – कर्मचारी यांना भरणा करणे आवश्यक आहे.

यामध्येही सवलत देणे आवश्यक असून केवळ कोरोना रुग्णांसाठी खाजगी दवाखान्यातून औषधोपचार घेतल्यास महापालिकेतर्फे ऑगस्ट 2020 अखेर 100 टक्के बिल अदा करण्यात येईल. महानगरपालिका सेवा विनियमातील नियम 136 नुसार कोरोनामुळे अधिकारी – कर्मचारी रुग्णालयात दाखल झाल्यास डिस्चार्ज नंतर 14 दिवसांची होम क्वारंटाईनसाठी विशेष रजा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.

उर्वरित रजा वैद्यकीय रजा म्हणून धरण्यात येईल. रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांची आवश्यकतेनुसार निवासाची व्यवस्था हॉटेल्स वा संबंधित ठिकाणी करण्यात येणार आहे. सर्व अधिकारी – कर्मचाऱ्यांना ग्लोव्हज, मास्क, सॅनिटायजर पुरविण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत, महापालिका आयुक्तांनी सांगितले.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn