Pune : राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेसाठी वेदांत भालेकर यांची निवड

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रीय मंडळ आणि पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेच्या वतीने आयोजित राज्य अजिंक्यपद स्पर्धा आणि निवड चाचणी मल्लखांब स्पर्धा टिळक रोड येथे महाराष्ट्रीय मंडळात घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण 34 जिल्ह्यातून 900 स्पर्धक,100 पंच सहभागी झाले होते.

ही स्पर्धा 12,14,16,18 या वयोगटात घेण्यात आली. यामध्ये विद्यानंद भवनच्या वेदांत भालेकर याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच याच विद्यालयाच्या वेदांत भालेकर याने 14 वर्ष वयोगटात उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात सातवा क्रमांक मिळवला आहे.

सच्चिदानंद एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भरत चव्हाण पाटील यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.यावेळी माध्यमिक च्या मुख्याध्यापिका छाया हब्बू, सविता किंगरे, जया श्रीनिवास, क्रीडाशिक्षक साहेबराव जाधव व पालक आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.