Pune Vegetable Price : हॉटेल, खानावळी सुरू असल्याने फळभाज्यांना मागणी वाढली

एमपीसी न्यूज – पावसाने उघडीप दिल्याने फळभाज्यांची आवक मार्केट यार्डात वाढली आहे. तसेच आता हॉटेल, खानावळी सुरू होणार असल्याने फळभाज्यांना मागणीही वाढली आहे.

हिरवी मिरची, सिमला मिरची, कारली, दोडका, फ्लॉवर, कोबी, वांगी, लसुण आणि भुईमुगाच्या भावात वाढ झाली आहे. तर, मागणीच्या तुलनेत आवक वाढल्यामुळे टोमॅटो, शेवगा, भेंडी आणि दुधी भोपळाच्या भावात घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत.

हंगाम सुरू झाल्याने नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. स्थानिक मटारचा हंगाम संपला असून, मटारची सध्या परराज्यातून आवक होत आहे. त्यामुळे मटारचे भाव तेजीत आहेत, अशी माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.

रविवारी येथील बाजारात 80 ते 85 गाड्यांची आवक झाली. परराज्यातुून आलेल्या मालामध्ये इंदौर येथून 6 ते 7 टेम्पो गाजर, कर्नाटक, गुजरात येथुन 3 ते 4 टेम्पो कोबी, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि गुजरात येथून 8 ते 10 टेम्पो हिरवी मिरची, तामिळनाडू येथून शेवगा 3 टेम्पो, सिमला येथून 1 ट्रक मटार, आग्रा, इंदौर स्थानिक मिळून 45 ट्रक बटाटा, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून 6 ते 7 ट्रक आवक लसणाची झाली होती.

स्थानिक आवकेमध्ये सातारी आलं सुमारे 600 ते 650 गोणी, कोबी सुमारे 3 ते 4 टेम्पो, फ्लॉवर 7 ते 8 टेम्पो, भेंडी 8 ते 10 टेम्पो, गवार 3 ते 4 टेम्पो, सिमला मिरची 6 ते 7 टेम्पो, टोमॅटो 10, भुईमुग शेंगा सुमारे 150 गोणी, घेवडा 2 ते 3 टेम्पो, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, कांद्याम्ध्ये जुना 50 ते 60 ट्रक, तर नवीन कांद्यची चारशे गोणी आवक झाली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :
कांदा : नवीन 100-250, जुना 200-380, बटाटा : 220-300, लसूण : 700-1400, आले : 200-300, भेंडी : 250-300, गवार : 500-600, टोमॅटो : 150-250, दोडका : 400-450, हिरवी मिरची : 300-500, दुधी भोपळा : 150-200, चवळी : 200 -250 काकडी : 150-220, कारली : हिरवी 300-350, पांढरी 200-250, पापडी : 300-400, पडवळ : 200-250, फ्लॉवर : 200-300, कोबी : 150-220, वांगी : 350-350, डिंगरी : 200-250, नवलकोल : 100-120, ढोबळी मिरची : 400-500, तोंडली : कळी 450-500, जाड : 200, शेवगा : 550-600, गाजर : 200-250, वालवर : 300-350, बीट : 150-200, घेवडा : 650-700, कोहळा : 100-120, आर्वी : 200-250, घोसावळे : 150-200, ढेमसे : 200-250, पावटा : 300-350, भुईमूग शेंग : 400-500, मटार : पराराज्य 1000-1500, तांबडा भोपळा : 60-100, सुरण : 200-220, मका कणीस : 60-120, नारळ (शेकडा) : 1000-1600.

मागणी घटल्याने पालेभाज्यांच्या भावात घसरण :
पालेभाज्यांचे भाव मागील काही दिवसांपासून तेजीत आहेत. तरीही मागणी घटल्याने कोथिंबिरीच्या भावात घाऊक बाजारात जुडीमागे 7 रुपयांनी घसरण झाली आहे. करडईच्या भावात 4 रुपये, शेपूच्या भावात 3 रुपये, तर, चाकवत, अंबाडी आणि चवळईच्या प्रत्येकी 2 रुपयांनी घट झाली आहे.

तर मेथी, चुका आणि शेपूला मागणी वाढली आहे. त्यामुळे तिन्ही भाज्यांच्या भावात जुडीमागे अनुक्रमे सहा, चार आणि तीन रुपयांनी वाढ झाली आहे. मुळेच्या भावात दोन रुपयांनी वाढ झाली आहे. उर्वरित पालेभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.

कोथिंबिरीची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत घटली असून, रविवारी एक लाख जुडी आवक झाली. जी गेल्या आठवड्यात दीड लाख जुडी होती. तरीही मागणी घटल्याने कोथिंबिरीच्या भावात घसरण झाली आहे. कर्नाटक येथून जास्त आवक असली, तरीही आता पुणे विभागतूनही आवक सुरू झालेली आहे. मेथीची आवक मात्र घटली आहे. गेल्या आठवड्यात 50 हजार जुडी झाली होती. ती कमी होऊन रविवारी 35 हजार जुडी झाली. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने मेथीचे भाव सर्वाधिक वाढले आहेत.

पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) :
कोथिंबीर : 1500-2800, मेथी : 1500-2200, शेपू : 1000-1500, कांदापात : 800-1300, चाकवत : 500-800, करडई : 500-600, पुदिना : 300-500, अंबाडी : 500-800, मुळे : 800-1300, राजगिरा : 500-800, चुका : 800-1000, चवळई : 500-600, पालक : 1000-1200.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.