Pune: संचारबंदीमुळे भाजीपाल्याचे दर कडाडले!

एमपीसी न्यूज – राज्य शासन वारंवार जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार असल्याचे सांगत आहे,पण संचारबंदीमुळे सध्या पुणे शहराच्या कानाकोपऱ्यातील भाजीपाला विक्रेते दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे पुणेकरांना भाजीपाला मिळत नसल्याचे चित्र आहे. आहे तो भाजीपाला अवव्वाच्या सव्वा दराने विकला जात आहे.
भाज्याचे दर प्रचंड कडाडले असून त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. 10 ते 20 रुपये किलो असलेले टोमॅटो 60 रुपये किलो, बटाटे 50 रुपये किलो, वांगी 60 रुपये किलो, कांदे 100 ते 150 रुपये किलो, फ्लॉवर 100 ते 120 रुपये किलो, मटार 100 रुपये किलो, कोथिंबीर, मेथी, पालक, शेपू, कांदापात, चवळी या सर्वच भाज्या तिप्पट ते चौपट दराने विकल्या जात आहेत.
दरम्यान, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्ड येथे मात्र भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचे दृष्य पाहायला मिळत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.