Pune : नगरसेविका ज्योती कळमकर यांनी उपलब्ध करून दिले भाजीपाला स्टॉल

एमपीसी न्यूज – सध्या पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. लोकांना भाजीपाला मिळणेही अवघड झाले आहे. नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 9 मधील सर्व सोसायटीच्या बाहेर भाजीपाला स्टॉल लावण्यात आले आहे.

नागरिकांनी अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने भाजीपाला खरेदी केला. प्रत्येक व्यक्तीमध्ये तीन फूट अंतर ठेवण्यात आले. भाजीपाला खरेदीसाठी वेळ लागत होता. पण, नागरिक स्पेशन्स ठेऊन वागत होते. असेच सर्वांनी नियम पाळले तर खरच आपण लवकरच कोरोनाला पळवून लावू, असा विश्वास ज्योती कळमकर यांनी व्यक्त केला.

बाणेर-बालेवाडी हा परिसर अतिशय वर्दळीचा परिसर म्हणून ओळखला जातो. पुण्याचे ‘नरिमन पॉईंट’ म्हणून संबोधले जाते. आज मात्र कोरोनाच्या महाभयानक संकटामुळे या भागात स्मशान शांतता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.