Pune : भाजीपाला, फळं बाजारात मालाची आवक, व्यवहार चालू

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारने वाहतुकीला परवानगी दिल्यानंतर महाराष्ट्रातही पुणे, मुंबई, नागपूर या प्रमुख शहरांतील भाजीपाला, फळं बाजार चालू झाले आहेत. शेतकऱ्यांचे बचत गट आणि राज्य सरकार यांच्या प्रयत्नांमधून बाजारातील व्यवहार सुरु करण्याला यश आले आहे. जीवनावश्यक वस्तूंची विक्री 24 तास चालू ठेवण्यास सरकारने मुभा दिलेली असल्याने ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी करु नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा केले आहे.

गेल्या २४ तासांत सुमारे दहा हजार टन कांदे, बटाटे असा माल पुण्याच्या गुलटेकडी मार्केटमध्ये उतरवण्यात आला आहे. या व्यतिरिक्त मांजरी आणि खडकी येथील बाजारात सुमारे आठ हजार क्विंटल भाजीपाला, फळं हा माल पाठविण्यात आला आहे. अशी माहिती राज्य सरकारतर्फे देण्यात आली आहे. याशिवाय वाशी, मुंबई आणि नागपूर येथील बाजारातही सुमारे दोनशे गाड्यांची माल वाहतूक करण्यात आलेली आहे.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वितरणातील अडथळे पोलीस खात्याने दूर केले आहेत. त्यामुळे चितळे, अमूल, गोकूळ, गोवर्धन यांचे पदार्थ त्यांच्या आऊटलेट्समध्ये पोहोचवणे सुकर झाले आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा तुटवडा आता जाणवणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.