Pune: बिबवेवाडीत टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड, 4 जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune: Vehicles vandalized in Bibwewadi, crime registered against 4 persons दुचाकीवरून आलेल्या एका टोळक्याने लाकडी दांडक्याने या वाहनांची तोडफोड करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला.

एमपीसी न्यूज- बिबवेवाडी परिसरात दहशत पसरवण्याच्या हेतूने एका टोळक्याने रस्त्यांवर उभ्या केलेल्या वाहनांची तोडफोड केली. रविवारी (दि.7) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी चार अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी येथील बकुळानगर परिसरातील रस्त्यांवर ही वाहने पार्क करण्यात आली होती. रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या एका टोळक्याने लाकडी दांडक्याने या वाहनांची तोडफोड करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये दोन दुचाकी, ऑटोरिक्षा आणि एका ओम्नी व्हॅनचे मोठे नुकसान झाले. या प्रकाराची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.