Pune: ज्येष्ठ संगीतकार रवी दाते यांचे निधन

Pune: Veteran musician Ravi Date passes away ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचे ते बंधू होत.

एमपीसी न्यूज- ज्येष्ठ संगीतकार रवी दाते (वय 81) यांचे पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. रवी दाते हे रसिकाग्रणी रामूभैय्या दाते यांचे पुत्र तर, ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचे बंधू होत. कविवर्य सुरेश भट यांच्या अनेक गझलांना त्यांनी स्वरबद्ध केले.

रवी दाते यांना न्यूमोनिया विकारामुळे आठ दिवसांपूर्वी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत बुधवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रवी दाते यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना तबल्याची साथसंगत केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.