Pune : राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आणि समता परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांचे निधन

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय महात्मा समता परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुणे फेस्टिवलचे मुख्य संयोजक तसेच दि. सासवड माळी शुगर फॅक्टरीच्या चेअरमनपदी ते कार्यरत होते. आज रविवारी (दि. १० फेब्रुवारी) सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली.  त्यांच्या पार्थिवावर नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार दुपारी ३ वाजता करण्यात येणार आहे.

राजकीय क्षेत्रापेक्षा सामाजिकतेचा व्यासंग जोपासून त्यांनी समाजाची सेवा केली. विविध संस्था, संघटनामध्ये ते पदाधिकारी होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.