Pune : विधानसभा निवडणूक 2019 : पक्ष तिकीट देईल तेव्हा देईल, सर्वपक्षीय उमेदवारांचा प्रचार सुरू

एमपीसी न्यूज : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष नेमक्या कोणत्या उमेदवाराला तिकीट देणार? याचा काहीही भरवसा नाही. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरूवात ही झालेली आहे. पण, शिवसेना-भाजप युती आणि काँगेस-राष्ट्रवादीचा आघाडीचे उमेदवार काही जाहीर झाले नाही. पक्ष तिकीट देईल तेव्हा देईल, त्यापूर्वीच सर्वपक्षीय उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीत आपणच तिकीट आणणार, असा विश्वास उमेदवार कार्यकर्ते आणि नागरिकांना देत आहेत.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात राष्ट्रवादी पर्वती, हडपसर, खडकवासला आणि वडगावशेरी मतदारसंघात घड्याळावर निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. त्यामध्ये पर्वती आणि हडपसर जागेवरून काँगेस इच्छुक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली. हा काँग्रेस संपविण्याचा डाव असल्याची टीका केली होती. त्यावर काँगेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सारवासारव करीत हे जागावाटप अंतिम नसल्याचे सांगितले.

प्रदेशाध्यक्ष जागावाटप जाहीर करणार असल्याचे बागवे म्हणाले. शिवसेना – भाजप युती होणार की नाही, याचा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे. 2014 चा निवडणुकीत भाजपने 8 ही मतदारसंघात कमळ फुलवले होते. या 8 पैकी शिवसेनेला 2 तर, आरपीआय (आठवले गट) ला 1 जागा हवी आहे. पण, भाजप 1 ही जागा सोडणार नसल्याची विश्वसनीय माहिती आहे. भाजपकडूनच तब्बल 103 इच्छुक आहेत. त्यांची समजूत घालताना नाकीनऊ येणार आहे.

अजित पवार यांनी मतदारसंघ जाहीर केल्याने उमेदवार कामाला लागले आहे. खडकवासला मतदारसंघातून विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, माजी महापौर दत्ता धनकवडे, नगरसेवक सचिन दोडके, महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, माजी आमदार कुमार गोसावी, भाजप नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, प्रसन्न जगताप, दिलीप वेडेपाटील, हडपसर मधून शहराध्यक्ष चेतन तुपे, माजी महापौर प्रशांत जगताप, वैशाली बनकर, नगरसेवक योगेश ससाणे, भाजप नगरसेवक मारुती आबा तुपे, उमेश गायकवाड, वडगावशेरीतुन माजी आमदार बापूसाहेब पठारे, नगरसेवक सुनील टिंगरे, पर्वतीतून नगरसेविका अश्विनी कदम, नितीन कदम, सभागृनेते श्रीनाथ भिमाले यांनी प्रचार सुरू केला आहे.

आघाडीत मनसे सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. या पक्षाला कोथरूड मतदारसंघ सोडण्यात येणार आहे. पण, राज ठाकरे यांनी अधिकृत भूमिका जाहीर केली नाही. भाजपचा विद्यमान 8 आमदारांनी सध्या मतदारसंघातच मुक्काम ठोकला आहे. नेतेमंडळी आल्यावर त्यांचा समोरासमोर करायचे. आपले तिकीट कट होऊ नये, यासाठी त्यांनी फिल्डिंग लावली आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी, शिवाजीनगर मतदारसंघात माजी नगरसेवक दत्ता बहिरट, मनिष आनंद, कसबा मतदारसंघात महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक धीरज घाटे, रवींद्र धंगेकर, स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर यांनी प्रचार सुरू केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.