Pune:विद्या व्हॅलीचा लोयोला हायस्कूलवर पेनल्टी शूटआउटमध्ये विजय;लोयोला फुटबॉल चषक 2024; सेंट व्हिन्सेंट हायस्कूलची तिन्ही गटांमध्ये आगेकूच

एमपीसी न्यूज -सेंट व्हिन्सेंट हायस्कूलने कमालीचे (Pune)सातत्य राखताना इलॅन (एक्स लोयोला अलुम्नी वर्क्स) आयोजित आणि  टाटा ऑटोकॉम्प प्रायोजित लॉयोला फुटबॉल चषक 2024 स्पर्धेच्या तिन्ही गटांमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली. मात्र, विद्या व्हॅलीने लोयोला हायस्कूलला पेनल्टी शूटआउटमध्ये बाहेरचा रस्ता दाखवत यजमानांची आगेकूच रोखली.

लोयोला एचएस मैदान, पाषाण येथे सुरू असलेल्या स्पर्धेत सोमवारी 14 वर्षांखालील गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत विद्या व्हॅलीने लोयोला हायस्कूलला पेनल्टी शूटआउटमध्ये 3-1 असे रोखले. निर्धारित वेळेत 1-1 अशी बरोबरी राहिल्याने पेनल्टी शूटआउटचा अवलंब करण्यात आला.

नियोजित वेळेच्या इंज्युरी टाईममध्ये प्रणय संचेतीने (50+3’) पेनल्टीवर लोयोला हायस्कूलला बरोबरी साधून दिली. तत्पूर्वी, कृष्णा चांदेरेने (44’) विद्या व्हॅलीला आघाडीवर नेले होते. पेनल्टी शूटआउटमध्ये विद्या व्हॅलीकडून कृष्णा चांदेरे, शौर्य मेहरा, रियान कोगेकर यांनी अचूक गोल केले. लोयोला हायस्कूलकडून प्रणय संचेती यालाच केवळ एक गोल करता आला.

तत्पूर्वी, 12 वर्षांखालील गटात सेंट व्हिन्सेंट हायस्कूलने मिलेनियम नॅशनल स्कूलविरुद्ध 1-0 असा विजय मिळवला. त्यात रेयान पंजाबीचा (18’) एकमेव गोल निर्णायक ठरला. अन्य लढतीत, लोयोला हायस्कूलने आरव पाटीलच्या (21’) गोलच्या जोरावर विद्या व्हॅलीवर 1-0 अशी मात केली. याच गटात विद्या भवनने आगेकूच करताना सेंट पॅट्रिक्स स्कूलचे आव्हान 1-0 असे संपुष्टात आणले. अरहत दोशी (5’) त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

14 वर्षांखालील गटात, सेंट व्हिन्सेंटच्या हायस्कूलने मिलेनियम नॅशनल स्कूलविरुद्ध 2-1 अशी बाजी मारली. अंश लोध (10’)व अ‍ॅश्टन काळे (31’) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. प्रतिस्पर्धी मिलेनियम नॅशनल स्कूलकडून अर्चिल पाटोळेने (9’) एक गोल केला.

16 वर्षांखालील गटात, सेंट व्हिन्सेंटच्या हायस्कूलने मिलेनियम नॅशनल स्कूलला 1-0 असे नमवले. त्यात शौनक धापटे (56’) याचा गोल निर्णायक ठरला.

बाद फेरीतील सहा सामन्यांचा निकाल पाहता  सेंट व्हिन्सेंट हायस्कूलने 12, 14, 16 वर्षांखालील गटाच्या, लोयोला हायस्कूल आणि विद्या भवनने 12 वर्षांखालील गटाच्या तर विद्या व्हॅलीने 14 वर्षांखालील गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

निकाल  (उपांत्यपूर्व फेरी)

12 वर्षांखालील –
सेंट व्हिन्सेंट एचएस: 1 (रायन पंजाबी 18’) विजयी वि. मिलेनियम नॅशनल स्कूल: 0
लोयोला हायस्कूल: 1 (आरव पाटील 21’) विजयी वि. विद्या व्हॅली: 0
विद्या भवन: 1 (अरहत दोशी 5’) बीटी सेंट पॅट्रिक स्कूल: 0

14 वर्षांखालील –
सेंट व्हिन्सेंट हायस्कूल: 2 (अंश लोध 10’, अ‍ॅश्टन काळे 31’) विजयी वि.  मिलेनियम नॅशनल स्कूल: 1 (अर्चिल पाटोळे 9’)
विद्या व्हॅली: 1 (3) (कृष्णा चांदेरे 44’; कृष्णा चांदेरे, शौर्य मेहरा, रियान कोगेकर) विजयी वि. लोयोला हायस्कूल: 1 (1) (प्रणय संचेती 50+3’ पेनल्टी.; प्रणय संचेती)

16 वर्षांखालील –
सेंट व्हिन्सेंट हायस्कूल: 1 (शौनक धापटे 56’) विजयी वि. मिलेनियम नॅशनल स्कूल: 0.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share