Pune: विद्यांचल हायस्कूलतर्फे 12 व्या आंतरशालेय ‘मान्सून ड्रॉईंग कॉम्पिटिशन’चे आयोजन

Pune: Vidyanchal High School organizes 12th Inter School Monsoon Drawing Competition यावर्षी ही चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून महाराष्ट्रातील सर्व शाळांतील पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना घरातूनच या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

एमपीसी न्यूज- पुण्यातील विद्यांचल हायस्कूलमध्ये 12 व्या वार्षिक आंतरशालेय मान्सून ड्रॉईंग कॉम्पिटिशनचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रातील सर्व शाळेतील पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे. या वर्षीच्या स्पर्धेचे परिक्षण आंतरराष्ट्रीय कलाकार पुनीता रंजन आणि चेतना सुदाम करणार आहेत.

कोरोनाच्या काळात सु्रक्षित आणि आनंदी जगण्यास शिकले पाहिजे. या विचाराने, यावर्षी ही चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून महाराष्ट्रातील सर्व शाळांतील पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना घरातूनच या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

विद्यांचल हायस्कूलच्या प्राचार्या सुनिता फडके म्हणाल्या, ‘गेल्या वर्षी शहरातील विविध शाळांकडून 400 प्रवेश मिळाले आणि यावर्षी ही संख्या वाढेल अशी आशा आहे.

आम्ही महाराष्ट्रभरातील शाळांपर्यंत पोहोचत आहोत आणि हा उपक्रम वाढविण्याच्या विचारात आहोत.

यावर्षी विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी प्रवेशिकांचे परिक्षण करण्यासाठी परिक्षकांच्या स्वरुपात विख्यात कलाकार पुनीता रंजन आणि चेतना सुदाम उपस्थित असतील. त्या पेंटिंगच्या बारकाव्यांविषयी आणि करियर घडविण्यासाठी मार्गदर्शन करतील.

नि:शुल्क असणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 4 जुलै आहे. ज्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे. त्यांना www.vidyanchalschool.com या लिंकवर लॉग इन करण्याची सूचना स्पर्धा व्यवस्थापनाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.