Pune :पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यास वैद्यकीय पथकाने गणेशभक्तांची केली अहोरात्र सेवा

एमपीसी न्यूज- बाप्पाच्या विसर्जनाच्यावेळी पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यास वैद्यकीय पथकाने अहोरात्र जागृत राहून गणेशभक्तांची सेवा केली. यामध्ये विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या 287 नागरिकांवर उपचार करण्यात आले तसेच रुग्णवाहिकेची सेवा देखील उपलब्ध करून दिली.

पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यास वैद्यकीय पथकाचे उदघाटन सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, मितेश घट्टे, विश्वस्त डॉ. मिलिंद भोई यांच्या उपस्थितीत झाले.

या पथकाचे समन्वय व नेतृत्व डॉ. मिलिंद भोई, डॉ.कुणाल कामठे, डॉ . नंदकिशोर बोरसे, डॉ. शंतनू जगदाळे, डॉ. केदार भोई, डॉ. राहुल सूर्यवंशी, सदाशिव कुंदेन, अशोक दोरुगुडे, जयशंकर माने, दत्ता बावधनकर, जयंत जानुगडे, डॉ. दिनेश बाउस्कर, पंकज दर्शिले यांनी केले. या उपक्रमाला रोटरी क्लब ऑफ मिडटाउन, शेठ ताराचंद रुग्णालय, दिलीप गिरमकर, गणेश घोष यांचेही विशेष सहकार्य लाभले.

या पथकामध्ये एकूण 192 डॉक्टर्स आणि स्वयंसेवक होते. लक्ष्मी रस्त्यावर गोखले हॉल, नारायण पेठ चौकी, केळकर रस्ता, स्वीट होम जवळ कुमठेकर रस्ता, शनिमंदिराजवळ इत्यादी ठिकाणी मदत केंद्रे उघडण्यात आली होती. दत्तवाडी, बेळगाव चौक, पुरम चौक, अलका चौक, एच सी चौक या ठिकाणी आपत्कालीन वैद्यकीय मदत केंद्रे आणि रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती

आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांवर उपचार करण्यात आले. यामध्ये चक्कर येणे, बीपी वाढणे, गुदमरणे, लहान मुलांचे कान दुखणे, ढोलताशा वादक व पोलीस याना इजा होणे, फ्रॅक्चर होणे अशा प्रकारच्या 287 रुग्णांवर उपचार करण्यात आले. आवश्यक त्या हिकानी रुग्णवाहिकेची मदत घेण्यात आली. यावेळी प्रचंड गर्दीतही गणेशभक्तांनी रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून देत सामाजिक जबाबदारीचे भान राखले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.