Pune – पूर्वीचे पालकमंत्री पाणी वाटपात गडबड करायचे , जलसंधारण मंत्री विजय शिवतारे यांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला 

एमपीसी न्यूज – पुणे शहराला पाणी पुरवठा कमी होऊ नये. अशी आमची आणि राज्य सरकारची देखील भूमिका आहे. तसेच शहराला आणि ग्रामीण भागाला योग्य प्रकारे पाणी पुरवठा होईल. मात्र या पूर्वीच्या काळात पालकमंत्री हे ग्रामीण भागाचे असायचे . म्हणून पाणी वाटपात गडबडी व्हायची . अशा शब्दात जलसंधारण मंत्री आणि शिवसेनेचे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या 11 गावाच्या प्रश्नांन बाबत आज जलसंधारण मंत्री आणि शिवसेनेचे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शिवतारे यांनी पाणी प्रश्नावर भूमिका मांडली.

यावेळी पुणे महानगरपालिका गटनेते संजय भोसले,नगरसेवक विशाल धनवडे, नगरसेविका संगीता ठोसर उपस्थित होते.

यावेळी शिवसेना मंत्री विजय शिवतारे म्हणाले की, पुणे शहराच्या हद्दीत असणार्‍या गावामध्ये अनाधिकृत नळ कनेक्शन घेण्यात आले आहे. यावर प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज असल्याची सूचना देखील त्यांनी केली.

समाविष्ट झालेल्या गावा बाबत ते म्हणाले की, पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या 11 गावांन मधील नागरिक संभ्रम अवस्थेत आहेत. त्या ठिकाणी कोणत्याही अधिकाऱ्याचे लक्ष नाही. पाणी, रस्ते, लाईट आणि कचरा प्रश्न भीषण झाला असून,तेथील सर्व कामे ठप्प असल्याने नागरिकांनी जायच कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर डीपीआर तयार करण्याची गरज आहे. त्यानंतर समाविष्ट गावामधील प्रश्न सुटण्यास आधिक मदत होईल. अशी मागणी त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.