Pune : विनायक शिरसाट खूनप्रकरण : ‘त्या’ फरार आरोपीला उत्तरप्रदेशातून केली अटक

एमपीसी न्यूज – शिवणे येथील आरटीआय कार्यकर्ता विनायक शिरसाट याच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून मुख्य आरोपी धरमप्रकाश कर्ताराम वर्मा (वय 38) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने आर्थिक कारणावरून विनायक शिरसाट याचा खून केल्याचे कबूल केले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरमप्रकाश वर्मा याचा पीओपीचा व्यवसाय होता. तर मयत विनायक शिरसाट हा सुद्धा पीओपीचा व्यवसाय करत होता. पीओपी मालाच्या पैशावरून दोघात भांडण झाले होते. याचाच राग मनात धरून वर्मा याने यापूर्वी अटक केलेले आरोपी मुक्तारअली आणि फारुख खान यांना हाताशी धरून 30 जानेवारी रोजी विनायक शिरसाट याला स्विफ्ट कारमध्ये घेऊन जाऊन धारदार शस्त्राचे वार करून त्याला ठार मारले आणि त्याचा मृतदेह मुठा गावाजवळील एका दरीत टाकून दिला.

अटकेत असलेल्या तीनही आरोपींनी गुन्ह्याची कबुली आहे. तिनही आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.